शिक्षण नकोच —- प्रत्यक्ष करणे आवश्यक
मी शिक्षणाला विरोध करतो. कृतिशील आयुष्यापासून वेगळे काढलेले शिक्षण आणि धमक्या, भीती, लोभ, लाच यांच्या दबावाखाली घडवून आणलेले शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे उपयुक्त. स्वतः दिशा ठरवलेले, हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेले काम. आज जगभर शिक्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे—-काही लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांना वळण लावणे, त्यांना आकार देणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकायला …